Pune : सोन्याच्या भावात 780 रुपयांची वाढ

एमपीसी न्यूज़ : पुण्यात आज सोन्याचा भाव 780 रुपयांनी (Pune) वाढला असून 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत आज 62 हजार 700 एवढी झाली आहे. काल सोन्याचा भाव 61 हजार 920 एवढा होता.

आज 23 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅमला 60 हजार 880 एवढा असून कालपासून सोन्याची किंमत 780 रुपयांनी वाढली आहे. काल हाच भाव 60 हजार 100 रुपये एवढा होता.

Pune : कालवे सल्लागार समिती बैठका पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

तसेच 22 कॅरेट सोन्याचा भाव 58 हजार 170 एवढा असून कालपासून यामध्ये 780 रुपयांनी वाढ झाली आहे. तर, चांदीचा भाव मात्र 1000 रुपयांनी (Pune) वाढला. आज 1 किलो चांदीचा भाव 78 हजार एवढा आहे. मागील काही दिवस चांदीचा भाव 1 किलोला 77 हजार एवढा होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.