Mahavitaran : पुणे परिमंडलात वीजग्राहकांकडे 133 कोटींची थकबाकी

एमपीसी न्यूज – महावितरणच्या (Mahavitaran) पुणे परिमंडलातील 6 लाख 60 हजार 527 वीजग्राहकांकडे 133 कोटी 37 लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक अशा सर्व विजग्राहकांचा समावेश आहे. वारंवार आवाहन करूनही थकीत वीजबिलांचा भरणा केला नसल्याने वीजपुरवठा खंडित कऱण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. यात 2 हजार 200 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

वीजग्राहकांना चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (दि. 29) व रविवारी (दि. 30) सार्वजनिक सुटीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहे. ग्राहकांना बिलाचा घरबसल्या भरणा करण्यासाठी करण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in वेबसाईट व मोबाईल अॅपद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे.

पुणे शहराची परिस्थिती – Mahavitaran

सद्यस्थितीत पुणे शहरात एकूण 2 लाख 88 हजार 236 वीजग्राहकांकडे 46 कोटी 99 लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती 2 लाख 9 हजार 771 ग्राहकांकडे 35 कोटी 37 लाख रुपये, वाणिज्यिक 21 हजार 105 ग्राहकांकडे 10 कोटी 21 लाख रुपये, औद्योगिक 2 हजार 949 ग्राहकांकडे 5 कोटी 53 लाख रुपयांची थकबाकी आहे. तर 1 हजार 518 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

Pune : कालवे सल्लागार समिती बैठका पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

पिंपरी-चिंचवड शहराची परिस्थिती –

पिंपरी चिंचवड शहरात एकूण 1 लाख 38 हजार 466 वीजग्राहकांकडे 35 कोटी 27 लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती 1 लाख 16 हजार 926 ग्राहकांकडे 19 कोटी 12 लाख रुपये, वाणिज्यिक 17 हजार 665 ग्राहकांकडे 7 कोटी 78 लाख रुपये, औद्योगिक 3 हजार 875 ग्राहकांकडे 8 कोटी 37 लाख रुपयांची थकबाकी आहे. तर 457 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

तसेच ग्रामीण भागातील आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, वेल्हे, हवेली तालुक्यांमध्ये एकूण 2 लाख 33 हजार 825 वीजग्राहकांकडे 51 कोटी 11 लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती 2 लाख 9 हजार 771 ग्राहकांकडे 35 कोटी 37 लाख रुपये, वाणिज्यिक 21 हजार 105 ग्राहकांकडे 10 कोटी 21 लाख रुपये, औद्योगिक 2 हजार 949 ग्राहकांकडे 5 कोटी 53 लाख रुपयांची थकबाकी आहे. तर 225 थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीजग्राहकांनी थकीत वीजबिलांचा त्वरीत भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.