Talegaon Dabhade : सौंदर्यप्रसाधने निर्मिती क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअरच्या मोठ्या संधी – डाॅ संभाजी मलघे

एमपीसी न्यूज – सौंदर्यप्रसाधनांची बाजारपेठ वाढत (Talegaon Dabhade) आहे. त्यामुळे सौंदर्य प्रसाधनांच्या निर्मिती क्षेत्रात करिअरच्या विद्यार्थ्यांना मोठ्या संधी आहेत, असे मत इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी व्यक्त केले. इंद्रायणी महाविद्यालय, विज्ञान विभाग आणि सिंबायोसिस कौशल्य व व्यावसायिक विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. 25) सौंदर्य प्रसाधन निर्मिती कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. मलघे बोलत होते.

अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संभाजी मलघे होते. मार्गदर्शन करताना प्राचार्यांनी सौंदर्यप्रसाधनाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे नमूद केले. तसेच विज्ञान विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक केले व कार्यशाळेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

मंगळवार, (दि 25) इंद्रायणी वरिष्ठ महाविद्यालय,विज्ञान विभागाच्या वतीने सौंदर्य प्रसाधन निर्मिती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये तृतीय वर्ष रसायनशास्त्र शिक्षण घेत असणाऱ्या एकूण ३० विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवीला. या दरम्यान सिंबॉयोसिस विद्यापीठमधील प्राध्यापिका अमृता महाजन व प्रयोगशाळा सहाय्यक आदिनाथ जांभळे यांनी विद्यार्थ्याना सौंदर्यप्रसाधने निर्मितीची प्रक्रिया, पॅकेजिंग, जाहिरात व मार्केटिंग समजावून सांगून सहभागी विद्यार्थ्याना विविध सौंदर्यप्रसाधने बनविण्याचे प्रात्येक्षिक करून दाखविले.

Mahavitaran : पुणे परिमंडलात वीजग्राहकांकडे 133 कोटींची थकबाकी

यामध्ये स्किन केअर सोप, हेअर ऑइल, शांपु, फेसवॉश, मॉस्चरायजर क्रीम इत्यादी सौंदर्यप्रसाधनांचा समावेश होता. सौंदर्यप्रसाधन यांचा मानवी जीवनातील महत्त्व व दैनंदिन जीवनातील वापर याबद्दल माहिती देत सौंदर्यप्रसाधनांचे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील बाजार व या क्षेत्रात असलेल्या विविध व्यावसायिक संधी याबद्दल (Talegaon Dabhade) मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेचे समन्वयक डिंपल सावंत यांनी सर्वांचे स्वागत केले व त्यांनी कार्यशाळा आयोजित करण्या मागचा हेतू सांगितला. विज्ञान विभाग प्रमुख रोहित नागलगाव यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व त्यांच्यामधे विविध व्यावसायिक कौशल्य रुजविण्यासाठी विज्ञान विभागामार्फत विविध उपक्रम राबवित असल्याचे सांगितले.

प्रमुख पाहुण्यांची ओळख प्राध्यापिका ऐश्वर्या शिंदे यांनी करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय वर्षेची विद्यार्थीनी कु. संस्कृती परशेट्टी यांनी केले व सर्वांचे आभार कु.अथर्व कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजनात प्रयोगशाळा सहाय्यक श्री. अनिकेत बोकरे याने महत्त्वाची भूमिका बजावली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.