Pune: वाघाच्या कातडे तस्करीप्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज – वाघाच्या कातडे तस्करीप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोघांना अटक केली. दोघेही वाघाचे काताडे घेऊन औरंगाबाद येथून पुण्यात आले होते. त्यांचेकडून अंदाजे 5,00,000/- रू. किंमतीचे वाघाचे कातडे, व 40,000/- रूपयेची माे.सा. जप्त केली आहे. अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याची किंमत सुमारे 40,00,000/- होऊ शकते.

रामेश्वर हिरश्चंद्र देशमुख (वय 35) आणि विजय गणपत जगताप (वय 38, दोघेही रा. औरंगाबाद) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मिळलेली माहिती अशी, दिनांक 28 सप्टेंबर २०19 रोजी युनीट 1 कडील पोलीस नाईक सचिन जाधव यांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरिक्षक बाेराटे आणि लहू सातपुते व युनीटकडील स्टाफसह समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत सापळा रचून कारवाई केली. यावेळी पोलिसांना दाेन इसम संशयितरीत्या दिसून आले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव पत्ता विचारता ते त्यांनी रामेश्वर हिरश्चंद्र देशमुख (वय 35) आणि विजय गणपत जगताप (वय 38, दोघेही रा. औरंगाबाद) अशी अटक केलेल्यांची नावे असल्याचे सांगीतले. त्यांचेकडून अंदाजे 5,00,000/- रू. किंमतीचे वाघाचे कातडे, व 40,000/- रू.ची माे.सा. जप्त केली आहे. अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याची किंमत सुमारे ४०,००,०००/- होऊ शकते.

याप्रकरणी समर्थ पोलीस स्टेशनमध्ये भारतीय वन्य प्राणी संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.