Pune : शॉपिंगसाठी दुकानात आलेल्या महिला चोरट्यांनी जीन्स चोरल्या, दोघींना अटक

एमपीसी न्यूज- शॉपिंग करण्याच्या निमित्ताने दुकानात आलेल्या दोन महिलांनी 10 जीन्स चोरल्याचे उघडकीस आले. पुण्यातील पाषाण परिसरात ही घटना घडली. चतुःशृंगी पोलिसांनी याप्रकरणी दोन 55 आणि 53 वर्षीय महिलांना अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाषाण येथील सुतारवाडी परिसरात आकाश सुतार यांचे कपड्याचे दुकान आहे. या दुकानात आरोपी महिला कपडे विकत घेण्याच्या निमित्ताने आल्या होत्या. दुकानात बराच वेळ घालवल्यानंतर त्या बाहेर पडल्या. दरम्यान दुकानमालकाला त्यांचा संशय आल्यामुळे त्या महिलाना थांबवून विचारपूस केली असता त्या उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्या. त्यामुळे पोलिसांना बोलावण्यात आले.

घटनास्थळी दाखल झालेल्या महिला पोलिसांनी या महिलांची झडती घेतली असता त्यांनी लपवून ठेवलेल्या 10 जीन्स सापडल्या. त्यानंतर पोलिसांनी या दोन्ही महिलांना अटक केली. त्यांच्यासोबत असणाऱ्या आणखी दोन महिलांचा शोध सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.