Pune : 14 वर्षाखालील मुलांच्या “व्हेरॉक क्रिकेट कप” स्पर्धेला 1 नोव्हेंबर पासून होणार सुरुवात

एमपीसी न्यूज – सालाबादप्रमाणे पीसीएमसीज व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीच्या वतीने युवा खेळाडूंना (Pune) प्रोत्साहित करण्याचे दृष्टिकोनातून 14 वर्षाखालील मुलांच्या “व्हेरॉक कप” क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 1 ते 10 नोव्हेंबर या कालावधीत घेतल्या जाणार आहेत.

या स्पर्धेत यजमान व्हेरॉक वेंगसरकर अकॅडमीच्या संघासह क्रिकेट नेक्स्ट अकॅडमी,आर्यन्स क्रिकेट अकॅडमी,पूना क्लब,डेक्कन जिमखाना,ट्रीनीटी क्रिकेट अकॅडमी अशा नामांकित सहा संघांना निमंत्रित करण्यात आले आहे. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण 10 नोव्हेंबर रोजी भारतीय संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर ह्यांचे हस्ते होणार आहे.

सामन्यांचे वेळापत्रक-

सुरुवातीला दोन गटात साखळी सामने होतील व गुणानुक्रमे दोन अव्वल संघांमध्ये 10 नोव्हेंबर रोजी अंतिम सामना होईल. (Pune) अंतिम सामना 10 नोव्हेंबर रोजी थेरगाव येथे होईल.थेरगाव येथील मैदानावर 1 नोव्हेंबर रोजी स्पर्धेचे उद्घाटन होईल, स्पर्धेतील सर्व सामने थेरगाव येथील मैदानावर होतील. प्रत्येक सामना 45 षटकांचा असणार आहे.

Pimpri : रिक्षाला धडक देत रिक्षा चालकाला सिमेंटच्या गट्टूने मारहाण

प्रत्येक सामन्यातील सामनावीरांना व स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज,गोलंदाज,क्षेत्ररक्षक व स्पर्धेतील मालिकावीर ठरलेल्या खेळाडूंना तसेच उपविजेता व विजेत्या संघाला चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.