Pune : शिरुर लोकसभा मतदारसंघात भाकरी फिरणार का ?

एमपीसी न्यूज- मागील काही दिवसांपासून अमोल कोल्हे हे भाजपात जाणार (Pune) अशी चर्चा होती.त्यामुळे नव्या कार्यकर्त्यांला शिरुरमधून संधी दिली जाईल अशी चर्चा होती.पण आज अमोल कोल्हे यांनी  शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालय येथे सुरु शिरुर, भिवंडी आणि जालना या तीन लोकसभा मतदार संघाच्या आढावा  बैठकीला हजेरी लावली.
 त्याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधी सोबत संवाद साधला असता शिरुर लोकसभा मतदारसंघात भाकरी फिरवणार का प्रश्न विचारताच ते म्हणाले की, तुम्ही काही काळजी करू नका.अतिशय व्यवस्थितपणे शरद पवार,जयंत पाटील,मी,दिलीप वळसे पाटील,अमोल कोल्हे आम्ही सर्व बसून योग्य मार्ग काढू , असे अजित पवार म्हणताच बाजूला उपस्थित असलेल्या शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी हसून त्यांना दाद दिली.

    
सुधीर मुनगंटीवारकडून ती अपेक्षा नव्हती : अजित पवार 
भाजपचे नेते मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला.त्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की,आपण त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार आहोत, संस्कार झाले असतील. त्यानुसार ते बोलणार,पण वास्तविक सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून ती अपेक्षा नव्हती अशी भूमिका मांडत अजित पवार यांनी सुधीर मुनगंटीवार(Pune) यांना सुनावले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.