Pune : सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयातील कामगारांचे 3 महिने झाले पगार नाही -राजाभाऊ लायगुडे

एमपीसी न्यूज – सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत येणाऱ्या कामगारांचे 3 महिने होऊन पगार झाले नसल्याचे भाजपचे नगरसेवक राजाभाऊ लायगुडे यांनी सांगितले. या कामगारांनी काय करायचे? असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. ठेकेदार कामगारांचा पीएफ सुद्धा भरत नसल्याचा आरोप नगरसेवक आनंद रिठे यांनी केला.

सर्व क्षेत्रीय कार्यालयाकडील झाडण हद्दीतील कामे आउट सोर्सिंगणे करण्यासाठी 33 कोटी 46 लाख रुपये वर्गीकरण करण्यात आले. त्यामुळे कामगारांच्या समस्या मार्गी लागणार असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी सांगितले. या वर्गीकरणातील 1 कोटी रुपये वर्गीकरण भवानी क्षेत्रीय कार्यालयाला देण्याची मागणी केली होती. तशी उपसूचना देण्यात आली. पण, कोंग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांनी ही उपसूचना मागे घेतली.

औंध – बाणेर, कोथरूड बावधन, घोलेरोड शिवाजीनगर, वारजे कर्वेनगर, ढोलेपाटील, नगररोड, येरवडा कळस धानोरी, कसबा विश्रामबागवाडा, सिंहगड रोड, कोंढवा येवलेवाडी, हडपसर मुंढवा, बिबवेवाडी, धनकवडी सहकारनगर, वानवडी हडपसर क्षेत्रीय कार्यालयासाठी 33 कोटी 46 लाख रुपये वर्गीकरण करण्यात आले. पण, भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाला शुन्य टक्के रक्कम दिल्याबद्दल भाजपच्या नगरसेविका मनीषा लडकत, भाजप नगरसेवक अजय खेडेकर, शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे, काँगेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांनी नाराजी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.