Bhosari : एमआयडीसी भोसरी पोलिसांच्या रेकॉर्डवरील तीन तडीपार गुन्हेगारांना अटक

एमपीसी न्यूज – एमआयडीसी भोसरी पोलिसांच्या रेकॉर्डवरील तीन तडीपार गुन्हेगारांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडाविरोधी पथकाने अटक केली. अमोल अशोक गायकवाड (वय 23, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी), विठ्ठल उर्फ नारायण अंबादास शिंदे (वय 24, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी), गणेश शांताराम शिंदे (वय 27, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी दरोडा विरोधी पथकाने दोन कारवायांमध्ये दोन तडीपार आरोपींना अटक केली आहे. पहिल्या कारवाईमध्ये पोलीस शिपाई सागर शेडगे यांना माहिती मिळाली की, एमआयडीसी भोसरी पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी अमोल गायकवाड हा बालाजीनगर झोपडपट्टी येथील संत निरंकारी मंदिराजवळ आला आहे. पोलिसांनी त्यांना सापळा रचून अटक केली.

दुसऱ्या कारवाईमध्ये पोलीस हवालदार अजय भोसले यांना माहिती मिळाली की, एमआयडीसी भोसरी पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार गुन्हेगार विठ्ठल उर्फ नारायण शिंदे हा बालाजीनगर झोपडपट्टी येथील लोकसेवा तरुण मंडळ वाचनालयासमोर आला आहे. पोलिसांनी सापळा रचून विठ्ठल यालाही अटक केली. दोघांनीही तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून पुणे जिल्ह्यात प्रवेश केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. तडीपारीचा आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिसऱ्या कारवाईमध्ये पओलीस हवालदार अजय भोसले यांना माहिती मिळाली की, एमआयडीसी भोसरी पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार गुन्हेगार गणेश शांताराम शिंदे टेल्को रोड, भोसरी येथे थांबला आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्यानेही तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून पुणे जिल्ह्यात आल्याचे सांगितले. त्यानुसार त्याला अटक करून एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी एमआयडीसी भोसरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त आर आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल लोहार, पोलीस उपनिरीक्षक अनिकेत हिवरकर, पोलीस कर्मचारी अजय भोसले, महेश खांडे, उमेश पुलगम, निशांत काळे, आशिष बोटके, विक्रांत गायकवाड, नितीन लोखंडे, सागर शेडगे, राजेश कौशल्ये यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.