Pune : येरवडा पोलिसांनी वायूगळती प्रकरणी टँकरचालकाविरुद्ध केला गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – नगर रस्त्यावर वडगाव शेरी परिसरात रासायनिक पदार्थाची (Pune ) वाहतूक करणारा टँकर उलटल्याप्रकरणी टँकर चालकाविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. निष्काळजीपणे टँकर चालवून मानवी जिवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

राजाराम दुबरी वर्मा (वय 51, रा. जयनगर, ता. फैजाबाद, जि. अयोध्या) असे गुन्हा दाखल केलेल्या टँकर चालकाचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई साईनाथ म्हस्के यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील रिलायन्स पेट्रोकेमिकल्स कंपनी कडून इथिलिन ऑक्साइड वायू घेऊन टँकर धाराशिव येथील बालाजी कंपनी येथे निघाला होता. नगर रस्त्यावर वडगाव शेरी येथे रविवारी मध्यरात्री टँकर उलटलून वायुगळती झाली.

Pune : आजपासून राष्ट्रपती तीन दिवस पुणे दौऱ्यावर

अपघातानंतर नगर रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. वाहनांच्या रांगा नगर रस्त्यावर लागल्या होत्या. (Pune ) 16 तासांच्या अथक प्रयत्नानंतर वायूगळती रोखण्यात यश आले. वायूगळती रोखताना पुरेशी काळजी घेतली नसती तर स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली असती.

अपघातग्रस्त टँकरमधील वायू दुसऱ्या टँकरमध्ये भरण्यात आला. रिलायन्स पेट्रोकेमिकल्स च्या तंत्रज्ञांनी घटनास्थळी भेट दिली होती. टँकरमध्ये ज्वलनशील वायू होता. नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.