Youth suicide : लोन ऍपवरून बदनामीची धमकी, 25 वर्षीय तरुणाची आत्महत्या

एमपीसी न्यूज : मोबाईल ॲप वरून लोन घेतल्यानंतर सतत येणाऱ्या धमक्यामुळे वैतागलेल्या एका 25 वर्षे तरुणाने आत्महत्या केली आहे. सोहेल शेख असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.(Youth suicide) विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. मयत मुलाच्या वडिलांनी त्याप्रकरणी तक्रार दिली असून विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Central Railways : व्यावसायिक मालमत्तेसाठी ई-लिलावाद्वारे मध्य रेल्वेकडून 22.81 करोड रुपयांचे 137 करार

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मयत सोहेल शेख या तरुणाने मोबाईल ॲप वरून कर्ज घेतले होते. त्यानंतर कर्जाची परतफेड करण्यासाठी या तरुणाला सातत्याने बदनामी करण्याची धमकी दिली जाते. एक कर्ज फेडण्यासाठी त्याने दुसरे लोन घेतले होते.(Youth suicide)त्यामुळे याची परतफेड करण्यासाठी त्याला सातत्याने फोनवरून बदनामी करण्याची धमकी दिली जात होती. या त्रासाला कंटाळून अखेर सोहेल शेख यांनी आत्महत्या केली आहे. विमानतळ पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.