Pune : मनसेचे वसंत मोरे यांच्या रॅलीला युवकांचा जोरदार प्रतिसाद

एमपीसी न्यूज – हडपसर मतदारसंघातील मनसेचे अधिकृत उमेदवार वसंत मोरे यांच्या रॅलीला युवकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरे यांच्या कात्रज गावठाणातील कार्यलयापासून रॅलीला सुरुवात झाली.

कात्रज, कोंढवा बुद्रुक, कोंढवा खुर्द, यनआयबीयम, महमदवाडी, मुंढवा, केशवनगर, मांजरी, बीटी कवडे रोड, रामटेकडी, साडेसतरानळी, हडपसर मतदारसंघांत ही रॅली काढण्यात आली. या रॅलीचा समारोप वैभव टॉकीज समोर हडपसर येथे झाला. रॅलीत युवकांनी मनसेचा ध्वज उंचावत वसंत मोरे यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. त्यामुळे संपूर्ण हडपसर मतदारसंघ मनसेमय झाला होता.

या रॅलीत नगरसेवक साईनाथ बाबर, माजी नगरसेविका आरती बाबर, भारत शिंदे, गोरख इंगळे, योगेश खैरे, प्रशांत मोरे, संदेश गाडगे, योगेश बाबर, संजय मोरे, प्रतीक कोडीतकर, शिवाजी भाडळे, विशाल ढोरे, निलेश टकले, सतीश गायकवाड यांच्यासह हजारो मनसे सैनिक सहभागी झाले होते. वसंत मोरे यांच्या विजयाच्या यावेळी घोषणा देण्यात आल्या.

हडपसरचा सर्वांगीण सुंदर विकास करण्यासाठी येत्या 21 ऑक्टोबरला रेल्वेइंजिनला मतदान करण्याचे आवाहन वसंत मोरे यांनी केले. मागील महिनाभरात हडपसर मतदारसंघ पिंजून काढला. या भागातील सर्व समस्यांचा अभ्यास केला. त्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.