_MPC_DIR_MPU_III

Vadgaon Maval : विकासासाठी राजकारण बाजूला ठेवून एकजुटीने प्रयत्न करा – भास्करराव म्हाळसकर

एमपीसी न्यूज – वडगाव शहराच्या विकासासाठी राजकारण बाजूला ठेवून जास्तीस जास्त निधी आणण्यासाठी एकजुटीने सर्वांनी प्रयत्न करा, असे आवाहन भाजपचे तालुका प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांनी केले.

_MPC_DIR_MPU_IV

सांगवी रस्ता ते ग्लोबल सिटीपर्यंतच्या १३ लक्ष रुपयांचा रस्त्याचे भूमिपूजन मावळ भाजपचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

_MPC_DIR_MPU_II

या रस्त्यासाठी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या फंडातून नगरसेवक दिनेश ढोरे यांनी पाठपुरावा केल्याने हा निधी मंजूर झाला आहे.

यावेळी भाजपाचे तालुका प्रभारी भास्करराव म्हाळसकर, वडगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी सुवर्णा ओगले, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी उपसरपंच पंढरीनाथ ढोरे, नितीन कुडे, किरण भिलारे, संभाजी म्हाळसकर, नगरसेवक दिनेश ढोरे, किरण म्हाळसकर, दिलीप म्हाळसकर, शाम ढोरे, अॅड विजय जाधव, अनंता कुडे, रमेश ढोरे, योगेश म्हाळसकर, गणेश ढोरे, आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक नगरसेवक दिनेश ढोरे, सुत्रसंचालन रवींद्र म्हाळसकर, आभार नगरसेवक किरण म्हाळसकर यांनी मानले.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.