Radhakrishna Vikhe Patil : धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्याने राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर उधळला भंडारा

एमपीसी न्यूज – धनगर समाजाने आक्रमक भूमिका(Radhakrishna Vikhe Patil ) घेत थेट सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळून जाहीर निषेध नोंदवला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, एकीकडे राज्यात मराठा आरक्षणाचा  मुद्दा गाजत असताना धनगर समाजही आक्रमक झाला आहे. सोलापूरमधील शासकीय विश्रामगृहात धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा टाकल्याचा प्रकार समोर आला आहे.

Chinchwad : चालत्या ओम्नी कारने घेतला पेट

पालकमंत्री विखे पाटील  सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान धनगर समाजातील आंदोलकांनी त्यांची घेतली. या भेटीवेळीच शेखर बंगाळे या आंदोलकाने विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा टाकला. तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे, अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.

दरम्यान, या संपूर्ण प्रकारानंतर भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलकांना मारहाण झाल्याचेही सांगण्यात येत आहे. धनगर समाजाला आरक्षणाचा मुद्दा अद्याप मिटलेला नसून लवकरात लवकर आरक्षण मिळावे तसेच ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, अशी मागणी यावेळी करण्यात (Radhakrishna Vikhe Patil )आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.