PMPML : पीएमपीएमएल लवकरच 200 मार्गांवर विनाथांबा, विनावाहक’ बस सेवा सुरू करणार

एमपीसी न्यूज – प्रवाशांची गरज लक्षात घेऊन ‘पीएमपीएमएल’ प्रशासन ( PMPML ) लवकरच 200 मार्गांवर ‘विनाथांबा, विनावाहक’ बस सेवा सुरू करीत आहे. त्या दृष्टीने मार्गांचे सर्वेक्षणदेखील झाले आहे.

प्रवाशांचा वेळ वाचावा म्हणून ‘पीएमपीएमएल’ने शहरांतील निवडक चार मार्गांवर विनावाहक व विनाथांबा बस सेवा सुरू केली आहे. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘सुपरफास्ट’ सेवेमुळे प्रवाशांच्या वेळेत 20 ते 25 मिनिटांची बचत होणार असल्याने जलद बससेवेचा विस्तार करण्याचे ठरविले आहे. त्यानुसारच 200 मार्गांच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे.

Radhakrishna Vikhe Patil : धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्याने राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर उधळला भंडारा

प्रवाशांना आपल्या कार्यालयात अथवा इच्छित स्थळी जलद पोचावे अशी इच्छा असते. मात्र, मार्गातील सिग्नल, वाहतूक कोंडी व थांब्यावर थांबणाऱ्या बसमुळे जलद प्रवासाच्या इच्छेला ‘ब्रेक’ लागतो. प्रवाशांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी ‘पीएमपीएमएल’चे अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांनी विनाथांबा व विनावाहक बस सेवा सुरू ( PMPML ) केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.