Joe Biden : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आज पहिल्यांदाच येणार भारतात

जी-20 परिषदेसोबतच अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्याची शक्यता

एमपीसी न्यूज -अमेरिकेचे  राष्ट्राध्यक्ष जो बायडन आज गुरुवारी 7 सप्टेंबर जी-20 परिषदेसाठी(Joe Biden) भारतात येणार आहेत.  राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे पहिल्यांदाच भारतात येणार आहेत.

सर्वसाधारणपणे जी-20 परिषदेदरम्यान दोन देशांमध्ये द्विपक्षीय बैठकीचे आयोजन केले जात नाही. परंतु, भारताने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याशी द्विपक्षीय बैठक करण्यास सहमती दर्शवली आहे. यावेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्याची देखील शक्यता आहे.

या बैठकीदरम्यान दोन्ही देशांमध्ये युक्रेनला संयुक्त मदत करण्यावरही चर्चा करण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तसेच, अमेरिकेतील भारतीयांसाठी अधिक उदार व्हिसा देण्याची व्यवस्था करण्याचा भारताकडून प्रयत्न करण्यात येईल.

PMPML : पीएमपीएमएल लवकरच 200 मार्गांवर विनाथांबा, विनावाहक’ बस सेवा सुरू करणार

तर दोन्ही देशांमध्ये नवीन वाणिज्य दूतावास स्थापन करण्यावरही चर्चा होण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे. इंडियन एक्सप्रेसला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जो बायडन यांच्या पहिल्या दौऱ्यासाठी योग्य संभाषण तयार करण्यासाठी भारत आणि अमेरिकेच्या (Joe Biden) अधिकाऱ्यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होत आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्या भारत दौऱ्यावेळी दोन्ही देश संभाव्य अणुकरारावर स्वाक्षरी करण्याची शक्यतादेखील आहे. याशिवाय ड्रोन डील आणि जेट इंजिनवरील संरक्षण करारासाठी अमेरिकन काँग्रेसच्या मंजुरीवरील प्रगतीवरही चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

जून महिन्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावेळी, दोन्ही देशांनी भारतात सहा अणुभट्ट्या तयार करण्याच्या मुद्द्यावर चर्चा केली. यावेळी त्यांनी न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) आणि वेस्टिंगहाऊस इलेक्ट्रिक कंपनी (WEC) यांच्यात देखील चर्चा केली.

सध्या काही लहान मॉड्युलर रिअ‍ॅक्टर तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी चर्चा सुरु असल्याचे म्हटले जात आहे. तसेच, याच मुद्द्यावर (Joe Biden) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.