Railway Protection Force : आरपीएफ मधील भरतीची जाहिरात खोटी; रेल्वेचे स्पष्टीकरण

एमपीसी न्यूज – रेल्वे सुरक्षा दलात (Railway Protection Force / RPF) शिपाई आणि उपनिरीक्षक पदांसाठी (Railway Protection Force )भरती जाहीर झाल्याची जाहिरात सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

त्याबाबत रेल्वे विभागाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. ती जाहिरात खोटी असून त्यावर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन रेल्वे विभागाकडून करण्यात आले आहे.

RTUEXAM.NET या संकेतस्थळावर रेल्वे सुरक्षा दलात (आरपीएफ) (Railway Protection Force )शिपाई आणि उपनिरीक्षक या 4 हजार 208 पदांसाठी भरती होणार असल्याची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ही जाहिरात बनावट आहे, तसेच ती रेल्वेच्या कोणत्याही अधिकृत प्लॅटफॉर्मवर आलेली नाही.

Maval : मावळ भाजपतर्फे 220 वारकरी, महिला अयोध्या दर्शनासाठी रवाना 

आरपीएफ किंवा रेल्वे मंत्रालयाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर, कोणत्याही माध्यमातून अशी कोणतीही अधिसूचना जारी केलेली नसून ही बातमी पूर्णपणे खोटी आणि चूकीची असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

अशा खोट्या माहितीला नागरिकांनी बळी पडू नये. भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर पद भरतीबाबत योग्य वेळी अधिसूचना प्रसिद्ध केली जाते, असेही रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.