PCMC : महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचा-यांचा सन्मान

एमपीसी न्यूज – महानगरपालिकेच्या प्रगतीसाठी 25 पेक्षा जास्त वर्षे सेवा (PCMC) करून सातत्याने प्रयत्न करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सार्थ अभिमान वाटत असून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी पुढील वाटचालीमध्ये उत्तम आरोग्य, आनंदी जीवन जगावे तसेच कुटुंबियांसाठी जास्तीत जास्त वेळ द्यावा, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माहे फेब्रुवारी 2024 अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या 13 आणि स्वेच्छानिवृत्त 1 अशा 14 कर्मचाऱ्यांचा सन्मान अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील (PCMC) दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृह येथे करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस अभिमान भोसले, उमेश बांदल, नथा माथेरे, चारुशीला जोशी तसेच कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे नातेवाईक उपस्थित होते.

Railway Protection Force : आरपीएफ मधील भरतीची जाहिरात खोटी; रेल्वेचे स्पष्टीकरण

माहे फेब्रुवारी 2024 मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये कार्यकारी दूरसंचार विभागाचे अभियंता थॉमस नरोन्हा, करसंकलन विभागाचे कार्यालय अधिक्षक बाळासाहेब कार्ले, मुख्य लिपीक प्रल्हाद शितोळे, गिरीष सलगरकर, आनंद निकाळजे, ग्रंथपाल सुमेधा नाफडे, वाहन चालक गजानन गोंड, मजूर बबन जागडे, अतुल खिरे, चांद शेख, परशुराम वाघेरे, निवृत्ती डोंगरदिवे, भिम चलवारे यांचा समावेश आहे. तर थेरगाव रुग्णालयातील स्टाफ नर्स किशोरी कोसळसकर यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी तर आभार कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.