Maval : मावळ भाजपतर्फे 220 वारकरी, महिला अयोध्या दर्शनासाठी रवाना 

एमपीसी न्यूज – मावळ तालुका भाजप तर्फे श्रीराम जन्मभूमी, अयोध्या दर्शन यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेसाठी मावळ तालुक्यातील 115 वारकरी आणि 105 महिला बुधवारी (दि. 28) रवाना झाले.
लोणावळा स्थानकावर हरिपाठ आणि प्रभू श्रीरामाची मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यानंतर आस्था विशेष रेल्वेने सर्व भाविक आयोध्येकडे रवाना झाले.

यावेळी तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ गुंड, सरचिटणीस अभिमन्यू शिंदे,सचिन येवले, महिला आघाडी अध्यक्षा सायली बोत्रे,प्रदेश सदस्य जितेंद्र बोत्रे,  संतोष कुंभार,वडगाव शहर अध्यक्ष अनंता कुडे,कामशेत शहर युवा मोर्चा अध्यक्ष प्रवीण शिंदे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र आप्पा भेगडे यांच्या सौजन्याने मावळ तालुक्यातील 115 वारकरी श्रीराम भक्त व 105 महिला श्रीराम भक्त असे एकूण 220 श्रीराम भक्त काल लोणावळा येथून अयोध्या दर्शन यात्रेसाठी विशेष आस्था ट्रेन ने रवाना झाले.तत्पूर्वी लोणावळा रेल्वे स्टेशन येथे वारकरी बांधवांनी सामूहिक हरिपाठ व भजन केले व महिला भगिनींनी फुगडी खेळत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
यावेळी रविंद्र आप्पा भेगडे यांनी प्रभू श्रीराम लल्लाची आरती करून सर्व श्रीराम भक्तांना सुखद प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.अयोध्या दर्शन यात्रेला जाण्याचे स्वप्न पूर्ण होत असल्याने वारकरी बांधवांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब,महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र आप्पा भेगडे यांचे विशेष आभार मानले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.