1993 Serial Blasts Case : सय्यद अब्दुल करीम टुंडा निर्दोष, अजमेरच्या टाडा न्यायालयाने दिला अंतिम निकाल

एमपीसी न्यूज : बहुचर्चित शताब्दी एक्सप्रेस ट्रेन साखळी बॉम्बस्फोट (1993 Serial Blasts Case ) प्रकरणात गुरुवारी मोठा निर्णय देण्यात आला. 1993 च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सय्यद अब्दुल करीम टुंडा याची अजमेरच्या टाडा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. 1993 मध्ये 5 शहरांमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपी अब्दुल करीम टुंडा याची टाडा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. तर, इरफान आणि हमीदुद्दीन या दोन दहशतवाद्यांना दोषी ठरवले आहे. हे प्रकरण 2014 पासून प्रलंबित होते.

Chinchwad : महिलांचा मतदानांचा टक्का वाढविण्यासाठी चिंचवडमध्ये विशेष मोहिम

याप्रकरणी टुंडासह सुमारे 17 आरोपींना अटक करण्यात आली होती. अजमेरच्या टाडा कोर्टाने गुरुवार 29 फेब्रुवारी 2024 रोजी कुख्यात आरोपी सय्यद अब्दुल करीम टुंडा याची 1993 च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष मुक्तता केली. टुंडावर शताब्दी एक्सप्रेस ट्रेन बॉम्बस्फोट खटला 2014  पासून प्रलंबित होता.

1993 ची ही दहशतवादी घटना काय होती?

ही घटना 6 डिसेंबर 1993 रोजी राजधानी एक्सप्रेस ट्रेनमध्ये घडली होती. दहशतवाद्यांनी ट्रेनमध्ये सीरियल बॉम्बचा स्फोट केला होता. या घटनेला बाबरी मशीद पाडल्याच्या पहिल्या वर्षपूर्तीचा बदला म्हणून संबोधण्यात आले. या प्रकरणी 17 आरोपींना पकडण्यात आले. (1993 Serial Blasts Case ) यातील 3 जणांवर (टुंडा, हमीदुद्दीन, इरफान अहमद) गुरुवारी निकाल सुनावण्यात आला. हमीदुद्दीनला 10 जानेवारी 2010 रोजी इरफान अहमदला 2010 नंतर आणि टुंडाला 10 जानेवारी 2014 रोजी नेपाळ सीमेवरून अटक करण्यात आली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.