Bhosari : घरफोडी करून पळून जाणाऱ्या चोरट्याला नागरिकांनी पकडले

एमपीसी न्यूज – घरफोडी करून दोघांनी 15 हजारांची रोकड(Bhosari) चोरली. त्यानंतर पळून जात असताना नागरिकांनी त्यातील एका चोरट्याला पकडले. ही घटना 21 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री पावणे एक वाजताच्या सुमारास इंद्रायणी नगर भोसरी येथे घडली.

 

किशोर श्रीकृष्ण मारुडवार (वय 64, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी(Bhosari)भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भीम पिरम साई (रा. शाहूनगर, चिंचवड. मूळ रा. नेपाळ) असे नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याच्यासह त्याचा साथीदार जीवन चंद याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी किशोर मारुडवार हे चिंचवड येथे राहत (Bhosari)असल्याने त्यांचे इंद्रायणीनगर भोसरी येथील घर कुलूप लावून बंद होते. 21 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री पावणे एक वाजताच्या सुमारास दोन चोरट्यांनी मारूडवार यांचे घर फोडले. घराचा दरवाजा फोडत असताना आवाज आल्याने शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी मारूडवार यांना फोनवरून माहिती दिली.

Pune : 12 मीटर रस्ता लवकरच होणार खुला – स्वप्नील दुधाने

त्यानुसार मारुडवार यांनी इंद्रायणीनगर मधील घराकडे धाव घेतली. दरम्यान चोरी करून पळून जात असलेल्या चोरट्यांचा शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी पाठलाग केला. त्यातील एकाला नागरिकांनी पकडले. तर एक जण पळून गेला. त्यानंतर मारुडवार यांनी घरात पाहणी केली असता बेडरूम मधील वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या. तसेच बेडरूमच्या कपाटातून 15 हजार रुपये चोरीला गेल्याचे उघडकीस आले. चोरट्यांनी घरातील सीसीटीव्ही डीव्हीआरची वायर देखील कट केली होती. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.