Pune : 12 मीटर रस्ता लवकरच होणार खुला – स्वप्नील दुधाने

एमपीसी न्यूज – कर्वेनगर-वारजे प्रभागातील सर्व्हे नं. 9 चिंतामणी रेसिडेन्सी,(Pune) बराटे एम्पायर, पिनॅक रेसिडेन्सी आणि आशा रेसिडेन्सी या सोसायटींच्या नजीक असणाऱ्या 12 मीटर रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते संपन्न झाला होता.

हा रस्ता लवकरच खुला होणार असल्याची माहिती सामाजिक(Pune) कार्यकर्ते स्वप्नील दुधाने यांनी दिली.

Pune : पुण्यात 1746 बड्या मालमत्तांची 5182 कोटी रुपयांची मालमत्ता कराची थकबाकी – विवेक वेलणकर

या रस्त्याच्या कामास दीड महिन्यापूर्वी सुरवात झाली असून आज प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पथ विभागाचे अधिकारी आणि संबंधित कंत्राटदार यांच्यासोबत या कामाची पाहणी करण्यात आली. या कामाचा आढावा घेतला. हे काम युद्धपातळीवर सुरू असून येत्या काही दिवसांत हा रस्ता प्राथमिक स्वरूपात वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल.

भविष्यात लवकरच अंदाजपत्रकात रक्कम जमा करून रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण होणार असून यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय कायमस्वरूपी बंद होईल, यात शंकाच नाही, असेही दुधाने यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.