Akurdi : पोलीस मित्र संघटनेच्या महिलांनी पोलीस चौकीत साजरे केले रक्षाबंधन

एमपीसी न्यूज – पोलीस मित्र संघटनेच्या महिलांनी आकुर्डी पोलीस चौकीमध्ये रक्षाबंधन सण पोलीस बांधवांसोबत साजरा केला.

रक्षाबंधनाच्या कार्यक्रमासाठी भाजप उपाध्यक्ष पिंपरी-चिंचवड शहर सारिका चव्हाण, युवा नेतृत्व सिद्धेश चव्हाण, वर्षा काळे, वर्षा शहा, पोलीस उपनिरीक्षक सीता वाघमारे, पोलीस हवालदार एन एन दामचे, पोलीस नाईक प्रकाश परब, महिला पोलीस नाईक एस डी गायकवाड, कबीर शिंजारी आदी उपस्थित होते.

प्रत्येक सण-उत्सव पोलीस बांधव काम करूनच साजरा करतात. त्यांना देखील प्रत्येक सण-उत्सव साजरा करण्याची इच्छा होते. परंतु कर्तव्याला प्राथमिकता देत ते समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी तत्पर राहतात. त्यामुळे समाजातील नागरिकांनी पोलिसांकडे जाऊन त्यांच्यासोबत विविध सण-उत्सव साजरे करायला हवेत. याच उद्देशाने पिंपरी-चिंचवड भाजप महिला आणि पोलीस मित्र संघटनेच्या वतीने रक्षाबंधनाचा सण आकुर्डी पोलीस चौकीमध्ये साजरा करण्यात आला. पोलीस बांधव दिवसभर ड्युटी करतात आणि रात्री घरी गेल्यानंतर रक्षाबंधन साजरे करतात. सणाचा आनंद त्यांच्या चेह-यावर दिवसभर राहण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला असल्याचे पिंपरी-चिंचवड भाजप महिला उपाध्यक्षा सारिका चव्हाण यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.