Pimpri: बाधितांनी प्लॉटची विक्री करु नये – महापौर जाधव  

एमपीसी न्यूज – रस्ता रूंदीकरणाने बाधीत झालेल्या लाभार्थ्यांनी देण्यात आलेले प्लॉट इतर कोणत्याही कारणास्तव वर्ग करू नयेत. कुणालाही विकत देऊ नयेत. याचा वापर आपल्यासाठी व आपल्या कुंटुबासाठी करावा असे, आवाहन महापौर राहूल जाधव यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत स्वामी विवेकानंद क्रीडा संकुल, कृष्णानगर, येथे तळवडे त्रिवेणीनगर येथील स्पाईन रस्त्याने बाधितांच्या पुर्नवसनासाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून मंजूर झालेल्या पेठ क्रमांक 11 मधील पर्यायी निवासी जागा क्रमांक 1 व 2 चे ले-आऊट मधील 77 भूखंडाचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

सभागृह नेते  एकनाथ पवार, क्रीडा, कला,साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती संजय नेवाळे, नगरसदस्या योगिता नागरगोजे, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे. सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे, मनोज लोणकर, अण्णा बोदडे, उपअभियंता अशोक अडसूळ, कनिष्ठ अभियंता सुदाम कु-हाडे यासह बहूसंखेने लाभार्थी उपस्थित होते.

एकनाथ पवार म्हणाले, आपण सर्व रस्ता बाधीतांनी वाहतूकीला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून जागा उपलब्ध करुन दिला. त्याबददल मी सर्वाचे आभार मानतो. आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे. याबाबत अनेक बैठका घेण्यात आल्या शासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. त्याला आज यश आले आहे. पुढील काळात या भूंखडांमूळे आपल्या राहणीमानात बदल व्हावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी प्रथमत: सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे यांनी भूंखड वाटपाबाबतच्या कार्यप्रणालीची माहिती दिली. तसेच अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी उपस्थित लाभार्थीना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले. तर, आभार माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.