New York : न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये झळकला राममंदिरचा डिजिटल बिलबोर्ड

Ram Mandir's Digital billboard flashed in New York's Times Square.

एमपीसी न्यूज – ऐतिहासिक राम मंदिराचे भूमिपूजन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयोध्या येथे पार पडले. देशात सर्व ठिकाणी आज उत्सवाचे वातावरण होते. अशात अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराच्या प्रसिद्ध टाइम स्क्वेअर चौकात देखील राम मंदिराचा डिजिटल बिलबोर्ड लावून राम मंदिरासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज दुपारी 12 वाजून 44 मिनिटांनी मंत्रोच्चाराच्या गजरात राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा पार पडला. त्यांनी एकूण नऊ शिळांचं पूजन केलं.

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराच्या प्रसिद्ध टाइम स्क्वेअर चौकात लावण्यात आलेल्या या डिजिटल बिलबोर्ड वर राम मंदिराचा जारी करण्यात आलेला अधिकृत फोटो व धनुष्यधारी प्रभू श्रीराम यांचा फोटो दाखवण्यात आला आहे.

दरम्यान, आज सकाळी पार पडलेल्या या सोहळ्याला पंतप्रधानांसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि सरसंघचालक मोहन भागवत हे उपस्थित होते. हे मंदिर बांधण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.