-MPC-TOP-MOST-BANNER-I

Ranjangaon Crime News: सराफाचे 28 लाखांचे दागिने लुबाडणारा चोरटा वर्षभरानंतर जेरबंद

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – श्रीक्षेत्र रांजणगाव येथील सराफाला धडक देऊन पाडून त्याच्याकडील 882  ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटणारा अट्टल चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. 

संतोष अनिल गायकवाड (वय 28  रा. धानोरा, ता. आष्टी, जि. बीड, सध्या रा. खंडोबा मंदिराजवळ, रांजणगाव) असे या चोरट्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव हद्दीतील सराफ दुकानदार श्रवण सिंग मोहब्बत सिंग परमार हे  एक वर्षाांपूर्वी आपले सोन्याचे दुकान बंद करून घरी निघाले होते. त्यांच्याजवळ असलेल्या बॅगेत 882 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व दिवस दिवसभरात झालेल्या धंद्याची रोख रक्कम 40 हजार रुपये असे एकूण 27 लाख 55 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल होता.

ही बॅग घेऊन ते कामगारांसह घरी येत असताना त्यांच्या मोटारसायकलला पांढऱ्या रंगाचे कारने पाठीमागून धडक देऊन त्यांना खाली पाडले. त्यावेळी त्यांची बाजूला पडलेली काळे रंगाची बॅग पाठीमागून आलेल्या चोरट्यांनी उचलून होती. याप्रकरणी रांजणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हा आरोपी एक वर्षांपासून फरार होता. हा आरोपी आज रांजणगाव येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. पुढील तपासासाठी त्याला रांजणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn