Pimpri : महापालिकेच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज – राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली,या झोपडीत माझ्या” अशा प्रकारच्या काव्यातून साध्या,सोप्या समाधानी जीवनाची सर्वांना शिकवण देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे संत तर होतेच याशिवाय ते अज्ञान,अंधश्रध्दा निर्मूलनासाठी जीवनभर कार्य करणारे थोर समाजसुधारक देखील होते असे मत सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे यांनी व्यक्त केले. (Pimpri) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे आणि विशेष अधिकारी किरण गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यावेळी नेमाणे बोलत होते.

यावेळी जनसंपर्क विभागाचे माहिती अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, विविध विभागाचे प्रशांत जोशी, संजय भडवळकर, बापू कांबळे,संजय शिंदे आदी उपस्थित होते.

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत

सहाय्यक आयुक्त नेमाणे म्हणाले राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी भजनांचा आणि किर्तनाचा प्रभावीपणे वापर केला.(Pimpri) आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना करणाऱ्या तुकडोजी महाराजांनी खंजिरी भजन यासारख्या प्रकारातून समाज प्रबोधन केले असे सांगून तुकडोजी महाराजांनी खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल याविषयीची परिणामकारक उपाययोजना सुचविली.ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे,औद्योगिकदृष्ट्या संपन्न व्हावे यासाठी तुकडोजी महाराज यांचा प्रयत्न असल्याचेही नेमाणे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.