MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) इतिहासातील सर्वात मोठी भरती प्रक्रियेतील महाराष्ट्र अराजपत्रित गट ब, गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत पार पडली असल्याचे लोकसेवा आयोगाने म्हटले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवारी (दि. 30) महाराष्ट्र अराजपत्रित गट ब, गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 आयोजित करण्यात आली. या परीक्षेकरिता एकूण 4 लाख 67 हजार 85 उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता. त्यांच्या बैठक व्यवस्थेकरिता राज्यातील 37 जिल्हा केंद्रावरील एकूण एक हजार 475 परीक्षा उपकेंद्रे निश्चित करण्यात आली होती. या पूर्व परीक्षेकरिता साधारणपणे 80 टक्के उपस्थिती असल्याचे दिसून आले असून परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यात आली आहे.

MPC News Special : शहरातील सट्टेबाजी ठरतेय पोलिसांची डोकेदुखी

महाराष्ट्र अराजपत्रित गट ब, गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 परीक्षेमधून राज्य शासनाच्या विविध विभागातील एकूण 8 हजार 169 पदे भरली जाणार आहेत.(MPSC) आयोगामार्फत आतापर्यंतची ही सर्वात मोठी भरती असून अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांची संख्या देखील आयोगाच्या इतिहासातील सर्वोच्च संख्या आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.