MPC News Special : शहरातील सट्टेबाजी ठरतेय पोलिसांची डोकेदुखी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांत क्रिकेटच्या सामन्यांवरील सट्टेबाजीचे प्रमाण वाढले आहे. शहरातील विविध भागांमध्ये सट्टेबाज आपली यंत्रणा (MPC News Special) कार्यान्वीत करून सट्टे लावत आहेत. पोलिसांनी यापैकी अनेकांवर कारवाई केली आहे. मात्र, अद्यापही क्रिकेटच्या सामन्यांवर सट्टे लावलेच जात आहेत.

एप्रिल महिना सुरु झाल्यापासून खंडणीविरोधी पथक, युनिट वन तसेच स्थानिक पोलीस ठाण्यांनी शहरातील आठ ते दहा सट्टेबाजांवर छापा टाकून त्यांना अटक केली आहे. पोलिसांनी या सट्टेबाजांची पूर्ण यंत्रणा उद्धस्त केली आहे. सट्टेबाजांचे मोबाईल, लॅपटॉप, त्यांची वाहनेही जप्त केली आहेत. पोलिसांकडून एवढी मोठी कारवाई होत असतानाही शहरातील सट्टेबाजीचा व्यावसाय थांबायचे नाव घेत नाही.

Pimpri : जागतिक हिमोफिलीय दिननिमित्त कार्यक्रमाचे आयोजन 

भारत – पाकिस्तान सामना किंवा भारताबरोबर इतर कोणत्याही देशाचा सामाना असला की शहरातील सट्टेबाज एक्शन मोडमध्ये येतात. (MPC News Special) आयपीएलचा सिजन सुरु झाला की या सट्टेबाजांसाठी सुगीचे दिवस सुरु होतात. शहरातील सट्टेबाज आपली यंत्रणा कार्यान्वीत करून सट्टेबाजीला सुरुवात करतात. लाखो-करोडो रुपयांची उलाढाल या सट्टेबाजीच्या माध्यामातून केली जाते.

पोलीस यंत्रणा कमकुवत ठरतेय

शहरातील विविध भागांत खूलेआमपणे सट्टेबाजी चालते. अनेक सट्टेबाज आपल्या ऑफिस किंवा फ्लॅटमध्ये सट्टे घेण्याचे काम करतात. शहरातील अनेक मोठे व्यावसायिक, स्थानिक बडे लोक यांच्या संपर्कात राहून सट्टेबाजी करतात. मात्र, यातील केवळ हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्याच लोकांवर पोलिसांकडून कारवाई होत आहे. त्यामुळे पोलिसांची यंत्रणा कमी पडते की काय असा प्रश्न निर्माण होत आहे.

गर्दी न करता फोनवर, ऑनलाईन माध्यमातून चालतात व्यवहार

सट्टा लावण्यासाठी कोठेही जाण्याची गरज नसते. सट्टेबाजांनी आपली ऑनलाईन यंत्रणा सज्ज ठेवलेली आहे. शहरातील मध्यवर्ती भागापासून ते तळेगाव, चाकण, मोशी अशा भागांमध्ये मोठ मोठे रो हाऊस, फ्लॅट भाड्याने घेऊन तेथून हे काम केले जाते. सट्टा लावणाऱ्या ग्राहकांना थेट फोनद्वारे सट्टा लावण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. त्यामुळे सट्टा सुरु असलेल्या ठिकाणी गर्दी देखील होत नाही.

त्या व्यावसायिकांकडे पोलिसांचे दुर्लक्ष

क्रिकेटवर सट्टा लावण्याचे काम कोणीही सर्वसाधारण माणूस करत नाही. सट्टेबाजी करणारे लोक हे पैसेवाले असतात. शहराच्या काही ठरावीक भागातील लहान-मोठे व्यावसायिक क्रिकेटवर सट्टा लावतात. यातील अनेक लोकांची पोलिसांना माहिती आहे. मात्र, त्यांच्यावर कधीही कारवाई होताना दिसत नाही. (MPC News Special) या लोकांवर कारवाई झाली तर नक्कीच शहरातील सट्टेबाजीचे प्रमाण कमी होईल, अशी चर्चा सध्या सुरू आहे..

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.