Pimpri : जागतिक हिमोफिलीय दिननिमित्त कार्यक्रमाचे आयोजन 

एमपीसी न्यूज – हिमोफिलीय या सारख्या असाध्य रोगांवर उपचारासाठी पुढच्या काळात डॉ. लोहारे यांच्या माध्यमातून हिमोफिलीय आजाराबाबत शासनाकडे महत्व पुर्ण मुद्दा उपस्थित करणार असल्याचे आमदार उपा खापरे यांनी संगितले, हिमोफिलीय रोगावर उपचारासाठी (Pimpri) महाराष्ट्रात उपाययोजना करण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. जागतिक हिमोफिलीय दिनाच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. तसेच हा आजार झालाच तर खचून न जाता स्वताला संभाळा असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

जागतिक हिमोफिलीया दिनानिमित्त चिंचवड हिमोफिलीया सोसायटी आॉफ महाराष्ट्र पुणे व बालरोग विभाग ऑडिटोरियम डॉ. डी.वाय. पाटील मेडीकल कॉलेज, पिंपरी यांच्या विद्यामाने हिमोफिलीया या रोगावर डॉ. चर्चासत्र, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन रविवार दि. 30 एप्रिल 2023 रोजी येथे करण्यात आले.

Man Ki Baat : ‘मन की बात’चा 100 वा भाग; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ऐतिहासिक भाषण

याप्रसंगी अध्यक्ष रशीद लीलाणी यांनी प्रस्ताविक केले. उपअध्यक्ष डॉ. सुनिल लोहारे, आमदार उपा खापरे ,उपाअध्यक्ष एस. के. राऊत, सेक्रेटरी, विजय चौरटीया, कार्यकारी मंडळ सदस्य अशोक देवकर, आनिता भोसले, धीरज चौधरी, (एच .ओ.डी) डॉ . माने ,संग्राम बनसोडे, आदी उपस्थित होते. (Pimpri) यावेळी तबला, बासरी, गीत , विद्यार्थ्यांनी सादर केले. तसेच अशोक ठाकुर यांनी उपस्थित असलेल्या नागरिकांना व रुग्णाना योगा करण्यास संगितले. एस. के, राऊत यांनी आभार मानले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.