Ravet Fraud : रावेत येथील एका व्यवसायिकाची 44. 20 लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज: रावेत येथील एका व्यवसायिकाची 44.20 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आलेली आहे.(Ravet Fraud) ही घटना 12 नोव्हेंबर 2016 ला कासरसाई येथे घडली आहे व त्याबाबत 22 ऑगस्ट 2022 ला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

National Flag: अनेक घरांवर अजूनही राष्ट्रध्वज

याबाबत पीडित फिर्यादी कुंदन काटकर वय 33 वर्षे राहणार रावेत यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.अचल डेव्हलपर्सचे मालक अमित व कलाटे वय 32 वर्षे, रा. राहणार वाकड या आरोपीस अटक करण्यात आले आहे. आरोपी अचल डेवलपर्सचे मालक अमित कलाटे यांनी फिर्यादींना प्लॉटिंग डेव्हलपमेंट मधील रस्त्याच्या कामाच्या बदल्यात 44,20,118 रुपये रक्कम ही स्टॅम्प ड्युटीसह परत द्यायचे होते.(Ravet Fraud) त्या बदल्यात कासरसाई येथील सर्वे नंबर 19/1 मधील 6.5 गुंठे या जागेचा ताबा देतो असे सांगितले अजून दिल्या नाही. फिर्यादी यांना कोणतीही रक्कम न देता आरोपींनी त्यांची 44,20, 118 रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.