Hinjewadi Crime: बावधन येथील दुकानातून 2.76 लाख रुपये रोख रक्कम व बिलिंग मशीन चोरीला

एमपीसी न्यूज: बावधन येथील दुकानातून 2.76 लाख रुपये रोख रक्कम व बिलिंग मशीन चोरल्याची घटना सोमवारी रात्री घडलेली आहे.(Hinjewadi Crime) याबाबत दशरथ भद्रशेट्टे,  रा. बालेवाडी स्टेडियम मागे, महाळुंगे यांनी फिर्याद हिंजवडी पोलीस ठाण्यात दिली आहे.

Ravet Fraud : रावेत येथील एका व्यवसायिकाची 44. 20 लाख रुपयांची फसवणूक

दोन अनोळखी इसम वय 25 ते 30 वर्षे यांच्याविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम 457, 380, 427 व 34 अन्वे हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Hinjewadi Crime) या आरोपींनी अंगामध्ये टी-शर्ट घातलेला होता. तसेच एकाने हाफ पॅन्ट घातलेली होती. फिर्यादी यांच्या संगम इंटरप्राईजेस या बावधन मधील दुकानाचे शटर व कॅमेरा तोडून व खिडकीचे ग्रील तोडून आरोपींनी बंद दुकानात प्रवेश करून 2,76,384 रुपये रोख रक्कम व बिलिंग साठी वापरात असलेली मशीन चोरून नेली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.