Ravet Crime News: कारमधून अडीच लाखांचे सोन्याचे दागिने असलेल्या बॅगची चोरी

एमपीसी न्यूज – रावेत येथे भोंडवे लॉन्स बाहेर पार्क केलेल्या गाडीतून सुमारे दोन लाख 60 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असलेली बॅग चोरली जाण्याची (Ravet Crime News) घटना घडली आहे.

याबाबत पीडित महिलेने देहूरोड पोलीस ठाण्याच्या रावेत चौकीत फिर्याद दिली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याच्या  विरोधात भा. द. वि. कलम 379 अंतर्गत गुन्हा 17 जूनला दाखल (Ravet Crime News) करण्यात आला आहे.

Ashadhi Wari 2022 : शहराच्या पालखीमार्गावर ड्रोन, ड्रोन सदृश्य कॅमेराने छायाचित्रण करण्यास मनाई; पोलिसांकडून आदेश जारी

फिर्यादी महिला त्यांच्या मोठ्या भावाच्या मालकीची स्कॉर्पिओ कार MH12DC5000 भोंडवे लॉन्सच्या बाहेर रस्त्याच्या बाजूला लॉक करून पार्क केली व हळदी समारंभासाठी कार्यालयात गेल्या. त्यावेळेस गाडी मध्ये ठेवलेल्या  बॅगेतील दागिन्यांचा बॉक्स अज्ञात चोरट्याने लंपास केला.
Jammu Kashmir Killings : पुलवामामध्ये दहशतवाद्यांकडून पोलिसाची हत्या, घरात घुसून गोळीबार
त्या बॉक्समध्ये 2 लाख 59 हजार 254 रुपये किमतीची 87.360 ग्रॅम वजन असलेली सोन्याची मोहनमाळ होती, असे फिर्यादीत म्हटले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.