Sus Khind Robbery: भरदुपारी टेम्पोमालकाला मारहाण करीत लुबाडला 50 हजारांचा ऐवज

एमपीसी न्यूज – भरदुपारी एका टेम्पोमालकाला आडवून मारहाण करीत त्याच्याकडील सुमारे 50 हजार रुपयांचा ऐवज लुबाडण्याची धक्कादायक प्रकार (Sus Khind Robbery) सूस खिंडीजवळ घडला.

भाजीपाला विक्रेते अजित भसाळे हे त्यांचा टेम्पो घेऊन जात असताना 16 जूनला दुपारी चारच्या सुमारास सुस खिंड – सुस रोड हॉटेल नंदिनी समोर अनोळखी तीन जणांनी त्यांना आडवले व त्यांच्याजवळील ऐवज लुबाडला. याबाबत त्यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात तीन अनोळखी इसमांविरोधात (Sus Khind Robbery) फिर्याद  दिली आहे.

Ravet Crime News: कारमधून अडीच लाखांचे सोन्याचे दागिने असलेल्या बॅगची चोरी

यामुळे अनोळखी तीन आरोपी विरोधात भा. द. वि. कलम 392, 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jammu Kashmir Killings : पुलवामामध्ये दहशतवाद्यांकडून पोलिसाची हत्या, घरात घुसून गोळीबार

फिर्यादी त्यांचा टेम्पो घेऊन जात असताना तीन अनोळखी आरोपींनी त्यांना हाताने मारहाण करून त्यांच्याकडील  11,500 रुपयांची रोकड व 14.850 ग्रॅम वजनाची रु 40,000 किमतीची सोन्याची साखळी असा ऐवज जबरदस्तीने चोरी करून घेऊन गेले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.