PCMC News: डेअरी फार्म उड्डाणपुलासाठी लष्कराची जागा, महापालिका 21 कोटी संरक्षण विभागाला देणार

एमपीसी न्यूज – पिंपरी डेअरी फार्म येथील उड्डाणपुलाच्या कामासाठी केल्या जाणाऱ्या रस्ता रुंदीकरणाकरिता लष्कराची 23 हजार 842 चौरस मीटर जागा पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे (PCMC) हस्तांतरित करण्यात येणार आहे. त्यापोटी लष्कराला 20 कोटी 98 लाख रुपये देण्यात येणार आहेत.

महापालिकेच्या (PCMC) वतीने पिंपरी डेअरी फार्म येथे रस्ता रुंदीकरण करण्यात येणार आहे. मात्र, रस्ता रुंदीकरणासाठी लष्कराची जागा हस्तांतरण करण्यासाठी महापालिकेच्या जुन्या प्रस्तावानुसार संरक्षण विभागास 8081 चौरस मीटर जागेसाठी 2 कोटी 86 लाख 87 हजार रुपयांची पूर्तता करण्यात आली. मात्र, महापालिकेच्या वतीने याठिकाणी रेल्वे उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यासाठी लष्कराच्या संरक्षण मालमत्ता अधिकारी यांना पिंपरी डेअरी फार्म येथील लष्कराची जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी 18 जून 2019 रोजीच्या पत्राद्वारे सुधारित प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यामध्ये संरक्षण विभागाच्या हद्दीतील 23 हजार 842.45 चौरस मीटर जागेची मागणी करण्यात आली. सुधारित प्रस्तावाअंतर्गत रेल्वे उड्डाणपुलासाठी लागणाऱ्या अत्यावश्यक जागेतील 8081 चौरस मीटर जागेवर उड्डाणपुलाचे काम करण्यास परवानगी मागण्यात आली होती.

संरक्षण मालमत्ता अधिकारी यांनी महापालिकेकडील 26 मे 2020 रोजीच्या पत्रानुसार, पुणे महापालिकेने चांदणी चौक एनडीए चौक परिसरातील संरक्षणविषयक जागेबाबत ज्याप्रमाणे प्रस्ताव सादर केला होता. त्याच धर्तीवर पिंपरी डेअरी फार्म येथील रस्त्यासाठी लष्कराची जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी राज्य शासनामार्फत संरक्षण विभागास प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना केली होती. त्यानुसार, महापालिकेने राज्याच्या नगरविकास विभागाच्या सचिवांमार्फत संरक्षण विभागास प्रस्ताव सादर केला होता.

Ravet Crime News: कारमधून अडीच लाखांचे सोन्याचे दागिने असलेल्या बॅगची चोरी

त्यास अनुसरुन राज्याच्या नगरविकास विभागाचे उपसचिव यांनी पिंपरी डेअरी फार्मच्या सुधारित प्रस्तावाअंतर्गत संरक्षण विभागाच्या हद्दीमधील 23 हजार 842.45 चौरस मीटर जागेचा प्रस्ताव संरक्षण विभागाच्या सहसचिवांना सादर केला होता. संरक्षण विभागाचे संचालक (जमीन) यांनी 21 मार्च 2022 रोजीच्या पत्रानुसार, डेअरी फार्म रस्ता रुंदीकरणासाठी लष्कराची एकूण 5.96 एकर जमीन महापालिकेला हस्तांतरित करण्यास मान्यता दिली आहे.

Ketaki Chitale : सुप्रीम कोर्टाने रद्द केलेलं कलम का लावलं?, महाराष्ट्रातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने कळवा पोलिसांकडे उत्तर मागितलं

त्या अंतर्गत महापालिकेस (PCMC) उर्वरित 20 कोटी 98 लाख रुपये संरक्षण विभागाला द्यावेत, अशा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, सुधारित प्रस्तावाअंतर्गत संरक्षण विभागाच्या हद्दीतील 23 हजार 842 चौरस मीटर जागेपोटी 20 कोटी 98 लाख रुपये संरक्षण मालमत्ता अधिकारी यांच्या नावे बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.