Prakash Amte : प्रकाश आमटे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; लवकरच सुरू होणार किमो थेरपी

एमपीसी न्यूज – ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे (Prakash Amte) यांना आज तात्पूरता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांचा मुलगा अनिकेत आमटे यांनी फेसबूक पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. पुढील चाचण्या पुढच्या दोन ते तीन दिवसांत होणार आहेत. लवकरच किमो थेरपीचे उपचार सुरू करण्यात येणार असून संपुर्ण उपचार पुण्यातील रुग्णालयात करण्यात येणार असल्याची माहिती या पोस्टमधून देण्यात आली आहे.

डाॅ. प्रकाश आमटे (Prakash Amte) यांना ब्लड कॅंसरचे निदान झाले. या निदानानंतर पुढील तपासण्या सुरू करण्यात आल्याचे त्यांचा मुलगा अनिकेत आमटे यांनी फेसबुक पोस्टद्वारे कळविले होते. डाॅ. आमटे यांच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले होते, मात्र आज त्यांना तात्पुरता डिस्चार्ज देण्यात आला असून आणखी काही तपासण्या लवकरच सुरू होणार आहेत. अनिकेत आमटे यांनी फेसबुक पोस्ट शेअर करून “बाबांची आज तब्येत बरी आहे” असे म्हणून हितचिंतकांना आनंदाची बातमी दिली आहे.

PCMC News: डेअरी फार्म उड्डाणपुलासाठी लष्कराची जागा, महापालिका 21 कोटी संरक्षण विभागाला देणार

फेसबुक पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?

अनिकेत आमटे फेसबुक पोस्टमध्ये लिहितात, “बाबांची आज तब्येत बरी आहे. आज सध्या पुरता डिस्चार्ज मिळाला आहे. 2-3 दिवसांनी चेक अप होईल. परत रक्ताच्या सर्व टेस्ट करतील आणि ब्लड values ठीक असल्यास लवकरच (8-10 दिवसात) किमो थेरपी सुरू करतील”, असे म्हणून प्रकाश आमटेंच्या आरोग्याविषयी माहिती दिली आहे.

Agneepath Scheme वरुन मोदी सरकार पॅनिक मोडमध्ये? तीन दिवसांत तीन मोठ्या घोषणा करुन असंतोषाची आग विझवण्याचा प्रयत्न

पुढच्या उपचारांबद्दल बोलताना अनिकेत म्हणाले, पुढील साधारण महिनाभर ट्रीटमेंट पुण्यातच होणार आहे. बाबांचा आजचा फोटो सोबत जोडला आहे रुमानी सोबतचा. पेशंट कसा असावा याचे आयडीयल उदाहरण आहेत बाबा. DMH दवाखान्यातील अतिशय आपुलकीने ट्रीटमेंट करणारे डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, मामा मावश्या सर्वांचे आभार. आपण सर्वांच्या शुभेच्छा धीर द्यायला सोबत आहेतच, असे म्हणून त्यांनी तेथील डाॅक्टर आणि मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.