Ravet fraud case : भागीदाराच्या आर्थिक व मानसिक त्रासाच्या विरोधात बांधकाम व्यावसायिक महिलेची तक्रार

एमपीसी न्यूज : बांधकाम व्यवसायात भागीदाराने केलेली तीन कोटींची फसवणूक व त्यानंतर पैशांची मागणी केली असता घरी येवून जीव देण्याची धमकी, (Ravet fraud case) या साऱ्या त्रासाला कंटाळून पीडित बांधकाम व्यावसायिक महिलेने संबंधीत व्यक्ती विरोधात थेट पोलीस आयुक्त व रावेत पोलीस ठाणे येथे 7 सप्टेंबर रोजी तक्रार दिली आहे.

पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, परमेश्वर (प्रमोद) नागनाथ सूर्यवंशी यांनी वेळोवेळी वेगवेगळ्या कारणांसाठी पैशाची मागणी केली. जानेवारी 2022 ते जुन 2022 या कालावधीत अनेकदा पैसे ट्रान्सफर करून स्वतःच्या खात्यात  जमा करून घेत, तीन कोटी रुपयांची फसवणूक केली.(Ravet fraud case) अनेकदा पैशा संबंधीच्या कागदपत्रांची मागणी करूनही त्यांनी प्रत्येक वेळी उडवा उडवीची उत्तरे दिली. प्रत्येक महिन्यात आपले काम होते असे भासवून रक्कम स्वतःच्या खात्यात जमा करून घेतली. जुन 2022 नंतर  पिडीत व्यावसायीक महिलेकडे असणारे सोने, गाडीतारण ठेवून पैसे घेतले. मात्र परतावा म्हणून आजपर्यंत प्रमोद यांच्याकडून  500 सुद्धा परत मिळालेले नाहीत.

Samata Parishad : पि. के. महाजन यांची समता परिषद शहर कार्याध्यक्षपदी निवड

तारण ठेवलेले सगळे सोडवून आणण्याची मागणी केली असता पैसे आले की सोडवू अशी उत्तरे देण्यात आली. किमान पैसे द्या असे म्हटल्यानंतर केली असता तुमच्या घरी येऊन सासु-सासरे, नवरा यांच्या समोर फाशी घेतो आणि तुम्हा सर्वांना अडकवतो असे व्हॉटसअप मेसेज करून धमकावण्यात येत आहे.

या साऱ्या आर्थिक व्यवहारात संबंधीत व्यावसायिक महिलेचे बँक खाते स्थावर मालमत्ता, सोन्या चांदीच्या वस्तू सगळेच पणाला लागले आहे. त्यांचे राहते घर सोडावे लागले.(Ravet fraud case) तसेच ज्यांच्या कडून उसने पैसे घतले होते ते आता पैशासाठी मागे लागले असून संपूर्ण कुंटुंबीय आर्थिक अडचणीत सापडले आहे. तरी संबंधीत व्यावसायिकाच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पीडित महिलेने निवेदनात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.