Samata Parishad : पि. के. महाजन यांची समता परिषद शहर कार्याध्यक्षपदी निवड

एमपीसी न्यूज – शहरातील ज्येष्ठ कार्यकर्ते पि. के. महाजन (Samata Parishad) यांची अखिल भारतीय समता परिषदेच्या पिंपरी चिंचवड महानगर कार्याध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे. समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते महाजन यांना नुकतेच मुंबई येथील बैठकीत नियुक्ती पत्र देण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, प्रदेश महिला अध्यक्षा मंजिरी धाडगे, प्रदेश उपाध्यक्ष अंबादास गारुडकर, शहर अध्यक्ष चंद्रशेखर भुजबळ आदी उपस्थित होते.

NABARD : नाबार्डद्वारे समर्थित ईशान्य फाउंडेशनचे 15 वे ‘यलो रिबन एनजीओ फेअर’

पि. के. तथा पांडुरंग कुमा महाजन हे पिंपरी चिंचवड (Samata Parishad) टॅक्स प्रॅक्टिस असोसिएशन, खान्देश माळी मंडळासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विविध पदांवर कार्यरत आहेत. समाजातील उपेक्षित आणि वंचित घटकांचे शिक्षण, प्रबोधन करून त्यांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आणि सर्व समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून काम करणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.