NABARD : नाबार्डद्वारे समर्थित ईशान्य फाउंडेशनचे 15 वे ‘यलो रिबन एनजीओ फेअर’

एमपीसी न्यूज – कारागीर व शेती उत्पादक (NABARD) तसेच सामाजिक संस्थाचा सहभाग असणारे 15 वे यलो रिबन एनजीओ फेअर येरवडा येथे 16 सप्टेंबरपासून पुणेकरांच्या भेटीला येत आहे.

या प्रदर्शनाचे आयोजन क्रिएटीसीटी (पूर्वीचा ईशान्य मॉल) यांनी केले असून क्रिएटीसिटी मॉल, येरवडा, विमानतळ रोड येथे ते भरणार आहे. यामध्ये लाइव्ह फूड काउंटरसह 100 हून अधिक एनजीओ, कारागीर, शेती उत्पादक, सामाजिक उपक्रमकर्ते यांचा सहभाग असणार आहे. सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत खुले राहणार आहे.

Students metro ride : 130 विद्यार्थ्यांनी घेतला महा मेट्रो सफरीचा आनंद

या 15 व्या यलो रिबन एनजीओ फेअरचे उद्घाटन नाबार्डचे (NABARD) जनरल मॅनेजर जी. एस राऊत आणि पारुल मेहता ( ट्रस्टी – ईशान्य फाउंडेशन) यांच्या हस्ते होणार आहे. या प्रदर्शनात हाताने विणलेल्या कपड्यांपासून विविध प्रकारच्या साड्यांपर्यंत, डोकरा ज्वेलरीपासून ते हाताने बनवलेल्या चपलांपर्यंत, शाल आणि स्टोल्स, विविध कलाकृती आणि वस्तू, ऑरगॅनिक कडधान्ये, ऑरगॅनिक मध आणि बरेच काही असेल. दर वर्षीप्रमाणे या वर्षी देखील शेतकर्यांची बाजारपेठ, स्मार्ट भेटवस्तू, आकर्षक कलाकृती लहान मुलांसाठी पपेट शो, स्टोरी टेलिंग, क्राफ्ट सेंटर्स आणि भरपूर काही असेल. विविध आकर्षक वस्तु आणि मनोरंजनासोबतच येथे असल्ल ग्रामीण पद्धत्तीच्या, स्वादिष्ट, मसालेदार खाद्यपर्दार्थांचा देखील आस्वाद घेता येईल जसे की भाकरी, झुणका, वांग्याचे भरीत, कांदा भाजी, पुरण पोळी आणि बरेच काही असणार आहे. अधिक माहितीसाठी नागरिकांना www.ishanyafoundation.org या साईटवर भेट देता येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.