Students metro ride : 130 विद्यार्थ्यांनी घेतला महा मेट्रो सफरीचा आनंद

एमपीसी न्यूज : देहूरोड येथील देहू रोड ऑर्डीनन्स फॅक्टरी मधील केंद्रीय विद्यालय नंबर 2 च्या 130 विद्यार्थ्यांनी महा मेट्रोच्या सफरीचा आनंद घेतला.(Students metro ride) त्यापैकी सहा विद्यार्थ्यांचा वाढदिवस मेट्रो ट्रेन मध्ये साजरा करण्यात आला.

सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर रमेश बंसल यांच्या प्रेरणेने देहूरोड येथील देहू रोड ऑर्डीनन्स फॅक्टरी मधील केंद्रीय विद्यालय नंबर 2 च्या 130 विद्यार्थ्यांनी आज महा मेट्रोच्या ट्रेन सफरीचा आनंद घेतला.(Students metro ride) या मेट्रो सफरीचे आयोजन केंद्रीय विद्यालय नंबर 2 चे प्राचार्य सीपी प्रशांत यांच्या मार्गदर्शनाखाली, महा मेट्रोचे ब्रँड ॲम्बेसिडर अमोल देशपांडे यांच्या संकल्पनेने व डॉक्टर रमेश बनसोड यांच्या प्रेरणेने करण्यात आले.

Jansanvad Sabha : उद्यानात अनधिकृतपणे जाहिरात फलक लावणा-यांवर कारवाई करा; जनसंवाद सभेत मागणी

केंद्रीय विद्यालय नंबर 2 च्या इयत्ता पाचवीच्या 130 विद्यार्थ्यांनी मेट्रो प्रवासाचा आनंद लुटला. त्यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या जवळील पिंपरी मेट्रो स्टेशन ते फुगेवाडी मेट्रो स्टेशन पर्यंत मेट्रो ट्रेन ने प्रवास केला.

महा मेट्रोचे डीजीएम मनोज कुमार डॅनियल यांनी मुलांचे स्वागत केले. या मेट्रो प्रवासात डॉ. रमेश बंसल, त्यांच्या पत्नी मुकेश बन्सल, त्यांचे पुत्र सिद्धार्थ बंसल,(Students metro ride) अग्रवाल समाज फेडरेशनचे उपाध्यक्ष विनोद बंसल, महा मेट्रोचे डीजीएम मनोज कुमार डॅनियल, महा मेट्रोचे ब्रँड अँबेसिडर अमोल देशपांडे, केंद्रीय विद्यालय नंबर 2 चे मुख्याध्यापक प्रवीर नाग, विद्यालयाचे पीजीटी मैस प्रतिभा तोमर, प्राथमिक शिक्षिका मर्सी सोजन, गोविंद सूर्यवंशी, संजीव सैनी सामाजिक कार्यकर्त्या आणि दवा बाजार चिंचवड येथील एम एम फार्माच्या कमला गुप्ता इत्यादी उपस्थित होते.

महा मेट्रोचे डीजीएम मनोज कुमार डॅनियल यांनी पीसीएमसी महा मेट्रो स्टेशनवर विद्यार्थ्यांचे व पाहुण्यांचे स्वागत केले. त्यांनी विद्यार्थ्यांना महा मेट्रो संबंधी प्राथमिक माहिती दिली. सर्वजण 11:45 वा च्या महा मेट्रो ट्रेन मध्ये बसून फुगेवाडी मेट्रो स्टेशनला रवाना झाले. प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सहा विद्यार्थ्यांचा जन्मदिवस आजच असल्यामुळे ट्रेनमध्येच केक कापून जन्मदिवस साजरा करण्यात आला.

डीजीएम मनोज कुमार डॅनियल यांनी फुगेवाडी मेट्रो स्टेशनवर विद्यार्थ्यांना महा मेट्रो बद्दल विस्तृत माहिती दिली. तसेच त्यांनी मुलांना उपहार पण दिले.(Students metro ride) सामाजिक कार्यकर्त्या कमळा गुप्ता यांनी देखील चॉकलेट वाटप केले. यावेळेस डीजीएम मनोज कुमार म्हणाले की, या प्रकारची महा मेट्रो ट्रिप इतर विद्यालयांनी देखील आयोजित केली पाहिजे. यामुळे मुलांच्या ज्ञानात वाढ होते. त्यांना अनुभव मिळतो आणि त्यांचा उत्साह द्विगुणीत होतो. डॉ. रमेश  बंसल यांनी विद्यालय प्रशासनाला हा मेट्रो प्रवास करण्यास राजी केल्याने डॉ. बंसल यांचे विशेष आभार मानले.

बन्सल म्हणाले की ही ट्रीप प्रायोगिक तत्त्वावर एका इयत्तेसाठीच होती. ते आता विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अशी ट्रीप आयोजित करण्यासाठी प्रेरित करतील.(Students metro ride)अशा मेट्रो ट्रिप सर्व विद्यालयांनी आयोजित केल्या पाहिजेत. यामुळे विद्यार्थ्यांचा मानसिक विकास होतो आणि विद्यार्थ्यांची ज्ञानात रुची वाढते. विद्यालयाच्या वतीने डॉक्टर बंसल, अमोल देशपांडे आणि मनोज कुमार डॅनियल यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.