Pimpri Corona Update : रुग्णसंख्येत मोठी घट! शहरात आज 16 नवीन रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड (Pimpri Corona Update) शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. शहराच्या विविध भागातील 16 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 12 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

Students metro ride : 130 विद्यार्थ्यांनी घेतला महा मेट्रो सफरीचा आनंद

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 629 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 70 हजार 663 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 340 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 333 रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

तर, केवळ 7 रुग्ण महापालिका (Pimpri Corona Update) रुग्णालयामध्ये दाखल आहेत. आज दिवसभरात 142 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 37 लाख 65 हजार 52  जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.