Ravet : ट्रेडिंग अॅपमध्ये पैसे गुंतवणे पडले महागात; 12 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – मोबाईलवर असलेल्या ट्रेडिंग एपवर (Ravet) पैसे गुंतवणे एकाला चांगलेच महागात पडले असून या एपद्वारे 12 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. हा प्रकार 28 मार्च 2022 ते 26 जुलै 2022 या कालावधीत घडली आहे.

आशिर्वाद मुकुंद उगे (वय 38 रा.पुणे) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Dehugaon News : शिळा मंदिरास चांदीच्या पादुका अर्पण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना त्यांच्या व्हॉटसअप वर 4915223679353 या नंबर वरून एसएमएस आला, त्यामध्ये डिव्हाईन काऊज एपची माहिती दिली होती. त्यामध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची माहिती दिली होती.

ते एक ट्रेडिंग एप होते. त्यानुसार फिर्यादी यांनी (Ravet) एपमध्ये 11 लाख 99 हजार रुपये गुंतवले. त्याचा काही काळ फायदा झाला, तसा तपशील एपवर दिसत होता. पण काहीकाळानंतर ती सर्व माहिती डिलीट झाली व बँलन्स दिसत नव्हता.

फसणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.