Dehugaon News : शिळा मंदिरास चांदीच्या पादुका अर्पण

एमपीसी न्यूज – देहूगाव येथील श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिरास अधिक उद्योग समूहाचे प्रमुख विजय सदाशिव बोत्रे परिवाराकडून चांदीच्या पादुका अर्पण (Dehugaon News) करण्यात आल्या.

विश्ववंदनीय, जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने नुकताच जीर्णोद्धार करण्यात आला आहे. जगद्गुरु, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज चतुःशताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने  तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या शुभहस्ते या मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले होते. तर काही दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते या मंदिराचा लोकाअर्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला होता.

 

Pimpri News : राज्यपालांची पदमुक्तीची इच्छा तातडीने पूर्ण करावी  – काशिनाथ नखाते

श्रीक्षेत्र पंढरपूरची आषाढी व कार्तिकी वारीची अखंड परंपरा असणाऱ्या श्री क्षेत्र येलवाडी येथील अधिक उद्योग समूहाचे प्रमुख विजय सदाशिवराव बोत्रे परिवाराच्या वतीने या शिळा मंदिरासाठी पाच लाख रुपयांच्या चांदीच्या पादुका मोरारी बापू यांच्या शुभहस्ते विधिपूर्वक अर्पण करण्यात आल्या.

या सोहळ्यासाठी अभिमत डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, अजयमहाराज मोरे, माणिकमहाराज मोरे, शिवाजीमहाराज मोरे, संजयमहाराज मोरे, संतोषमहाराज मोरे, देवस्थानचे माजी अध्यक्ष प्रल्हाद मोरे, येलवाडीचे सरपंच रणजित गाडे, उद्योजक शंकर बोत्रे, कैलास मोरे व श्री विजय सदाशिवराव बोत्रे परिवाराचे सदस्य व आप्तेष्ट (Dehugaon News) उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.