Dehugaon : प्रशासनाच्या विनंतीनंतर देहू ग्रामस्थांचे उपोषण सुटले; बैठक घेऊन शासन स्तरावर निर्णय होणार

एमपीसी न्यूज :  तीर्थक्षेत्र देहू येथील गायरान पोलीस आयुक्तांना (Dehugaon) देण्यास विरोध करण्यासाठी उपोषणास बसलेल्या ग्रामस्थांचचे उपोषण अखेर सुटले. तीर्थक्षेत्र देहू येथील गायरान वाचवण्यासाठी देहूतील लोकप्रतिनिधी, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे प्रतिनिधी आणि ग्रामस्थ यांची विभागीय आयुक्त/जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक आयोजित करून शासन स्तरावर निर्णय घेण्यात येईल. असे तहसीलदार डॉ अर्चना निकम यांच्या स्वाक्षरीचे प्रशासनाच्या वतीने विनंतीचे लेखी निवेदन दिल्यानंतर हे उपोषण सोडण्यात आले. यावेळी खासदार श्रींरंग बारणे, आमदार सुनील शेळके, उपविभागीय अधिकारी संजय असवले यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांनी सरबत घेऊन उपोषण सोडले.

Alandi : कार्तिकी यात्रे निमित्त 5 डिसेंबर पासून आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी

देहू नगरपंचायतीचेनगरसेवक, नगरसेविका, महसूल विभागातील पदाधिकारी, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. देहू नगरपंचायत (Dehugaon ) हद्दीतील गायरात जमीन क्षेत्रातील 50 एकर जागा पोलीस आयुक्तालयाला देण्यासाठी शासन स्तरावर हालचाली सुरू होत्या. ही जमीन देहूतील भाविक वारकऱ्यांच्या सोयी सुविधा आणि देहूतील विकास कामांसाठी अपुरी पडणार असल्याने कोणालाही देण्यात येवू नये. या मागणीसाठी देहू संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, संजय महाराज मोरे, नगराध्यक्ष पूजा दिवटे, स्मिता चव्हाण, योगेश परंडवाल, प्रवीण काळोखे, स्वप्निल काळोखे, प्रकाश काळोखे, प्रशांत काळोखे हे मुख्य मंदिरासमोर आमरण उपोषणास बसले होते.

दरम्यान उपोषणाला पंचक्रोशीतील ग्रामपंचायत, विविध सामाजिक, सांप्रदायिक, मंडळ, विविध कार्यकारी सोसायटी, संघटना, वारकरी सांप्रदायातील दिंड्या तसेच राज्यभरातून विविध जिल्ह्यातील वारकरी परिषद, संघटना, ग्रामस्थांकडून उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यात आला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.