Pimpri : आंतरशालेय कला स्पर्धा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल – अतिरिक्त आयुक्त खोराटे

एमपीसी न्यूज – विद्यार्थ्यांच्या सर्व प्रकारच्या कलागुणांना (Pimpri) वाव देण्यासाठी महानगरपालिका सतत प्रयत्नशील असते. केवळ चित्रकलाच नव्हे तर गीत गायन, लेझीम, लोकनाट्य, संगीत यांसह एकांकीका या विषयांचा समावेश असलेली आजपासून सुरू होणारी आंतरशालेय कला स्पर्धा ही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्रीडा विभागामार्फत आंतरशालेय कला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास क्रिडा अधिकारी अनिता केदारी, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, प्रशासन अधिकारी परशुराम वाघमोडे, स्पर्धा प्रमुख दीपक कान्हेरे, अरूण कडूस, रंगराव कारंडे, गोरख तिकोणे, आत्माराम महाकाळ, अनिल जगताप, बनसी आटवे उपस्थित होते.

आज झालेल्या चित्रकला स्पर्धेत 2340 विद्यार्थी सहभागी झाले होते त्यातील पाचवी ते सातवी वयोगटास तीन विषय देण्यात आले होते. त्यामध्ये एशियन स्पर्धेतील एक दृश्य, आवडते निसर्ग दृश्य आणि स्वच्छता अभियान असे तीन तर आठवी ते दहावी वयोगटासाठी मेरी माटी मेरा देश, चांद्रयान मोहिमेचे एक दृश्य आणि आपली वसुंधरा हे तीन विषय दिले होते.

चित्रकला स्पर्धेच्या प्रारंभी वाद्य वादन, लेझीम, समूहगीत, शास्त्रीय गायन, एकांकिका, सुगम संगीत व लोकनृत्य अशा विविध (Pimpri) कला सादर करण्यात आल्या. आंतरशालेय स्पर्धेमध्ये 2 डिसेंबर रोजी पिंपरी-चिंचवड संगीत अकादमी, निगडी येथे पहिली ते दहावी या विविध वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी वाद्यवादन स्पर्धा, 4 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान, संत तुकाराम नगर येथे आंतरशालेय लेझीम स्पर्धा, 6 व 7 डिसेंबर रोजी आचार्य अत्रे रंगमंदीर, संत तुकाराम नगर येथे समुहगीत स्पर्धा, 11 व 12 डिसेंबर रोजी एकांकीका स्पर्धा तर 13 व 14 डिसेंबर रोजी नटसम्राट निळु फूले नाट्यगृह, पिंपळेगुरव येथे लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

Dehugaon : प्रशासनाच्या विनंतीनंतर देहू ग्रामस्थांचे उपोषण सुटले; बैठक घेऊन शासन स्तरावर निर्णय होणार

या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना वाहतुकीसाठी नियोजन करण्यात आले आहे. या सर्व स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ 14 डिसेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता नटसम्राट निळू फुले नाट्यगृह, पिंपळेगुरव येथे संपन्न होणार आहे, अशी माहिती क्रिडा विभागाचे उप आयुक्त मिनीनाथ दंडवते यांनी दिली.

सदर चित्रकला स्पर्धेचे प्रास्ताविक उपायुक्त मिनीनाथ दंडवते यांनी, सूत्रसंचालन क्रीडा पर्यवेक्षिका जयश्री साळवे यांनी तर आभार क्रीडा अधिकारी अनिता केदारी यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.