Ravet: बंधाऱ्यातील पाण्याची पातळी खालावली; शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

एमपीसी न्यूज – रावेत बंधा-यातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराचा आजचा पाणीपुरवठा विस्कळीत असणार आहे, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.

मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवडकरांना पाणीपुरवठा केला जातो. धरणातून नदीपात्रात पाणी सोडले जाते. रावेत येथील बंधा-यातून महापालिका पाण्याचा उपासा करते. पाणी शुद्धकरुन शहरवासियांनी पाणीपुरवठा केला जातो.

रावेत बंधा-यातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे अशुद्ध जलउपसा केंद्रातील काही पंपस्‌ बंद करावे लागले आहेत. यामुळे पाण्याचा उपसा कमी होत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराचा आजचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी विभागाचे प्रयत्न सुरु आहेत. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.