Renault Kwid Electric : ‘रेनो’ची स्वस्त आणि मस्त Dacia Spring Electric फ्रांसमध्ये लाँच

एमपीसीन्यूज : फ्रान्स येथील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी रेनोने Dacia Spring Electric ही नवीन इलेक्ट्रिक कार फ्रान्समध्ये लाँच केली आहे. ही कार Renault Kwid 2021 वर आधारित आहे. या कारची किंमत 16,990  युरो ( विना अनुदान) इतकी आहे.

Dacia Spring WLTP च्या मते ही कार 230 किमीची रेंज प्रदान करते. या कारची WLTP सिटी रेंज 305 किमी आहे. या कारमध्ये 24.7  wkh बॅटरी पॅकचा वापर करण्यात आला आहे. ही बॅटरी 125 NM टॉर्क जनरेट करण्यासह 44  psची पॉवर देते.

_MPC_DIR_MPU_II

फ्रान्समध्ये ही कार दोन व्हॅरिएंटमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. यातील बेसिक व्हॅरिएंटमध्ये एसी, ब्लूटूथ, ऑडिओ सिस्टिम, एलईडी डीआरएल, फॅब्रिक अप होल्स्टरी आदी सुविधा आहेत. ही कार 16,990 युरो म्हणजे 15 लाखांत विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे.

दुसऱ्या व्हेरिएंटमध्ये स्मार्ट फोन कनेक्टिव्हिटी, रिअर कॅमेरा, रिअर पार्किंग सेन्सर आणि 7 इंचाची टाच स्क्रीन सिस्टिम आदी सुविधा देण्यात आल्या आहेत. या कारची किंमत 18,490 युरो म्हणजेच जवळपास 16  लाख रुपये आहे.

भारतात ही कार 2022  मध्ये लाँच होण्याची शक्यता असून येथे 10  लाख रुपयांत ही कार उपलब्ध होईल, असा अंदाज आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.