Mumbai News : रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक

एमपीसी न्यूज : मुंबईत टीआरपी घोटाळ्या प्रकरणी (TRP scam) मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मोठी कारवाई केली आहे. रिपब्लिक टीव्ही (Republic TV) या वृत्तवाहिनीचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक करण्यात आली आहे.

टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत 13 जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता रिपब्लिक टीव्हीच्या सीईओ विकास खानचंदानी यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहे. विशेष म्हणजे, विकास खानचंदानी यांची या आधीही चौकशी सुद्धा करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणी आज खानचंदानी यांना मुंबई पोलिसांनी अटक केली.

काही दिवसांपूर्वीच अर्णब गोस्वामी यांनी रिपब्लिक टीव्हीवर दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करावे, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात याचिकेतून केली होती. त्याचबरोबर या प्रकरणी सीबीआयकडून चौकशी करावी, अशी मागणीही गोस्वामी यांनी केली होती. त्यावर 7 डिसेंबर रोजी या याचिकेवर न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणी झाली.

सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास हा सीबीआयकडे देण्याबद्दल स्पष्ट नकार दिला आहे. ही याचिकाही फेटाळून लावण्यात आली आहे. तसंच रिपब्लिक टीव्हीवरील गुन्हे रद्द करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.