Chakan Crime News : 10 जणांच्या टोळक्याकडून घरात घुसून राडा

दोघांना मारहाण

एमपीसी न्यूजचायनीज सेंटरवर झालेल्या वादाच्या कारणावरून 10 जणांच्या टोळक्याने तरुणाच्या घरात घुसून राडा केला. तसेच तरुणाला आणि त्याच्या चुलतीला लाकडाने, लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 12) दुपारी दोन वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील हेदुरज येथे घडली.

याप्रकरणी प्रदीप सावंत, अमोल सावंत, गणेश भोर, तुकाराम सावंत, संजय सावंत (रा. पाळू, ता. खेड), विकास कलवडे, माऊली कलवडे (दोघे रा. प-हाळे, ता. खेड), विशाल डांगले (रा. पाईट, ता. खेड), आणि अन्य दोन अनोळखी इसम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुषार आनंदा बच्चे (वय 21, रा. हेदुरज, ता. खेड) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. 12)  दुपारी दीड वाजताच्या सुमारास फिर्यादी तुषार आणि आरोपी यांच्यात चायनीज सेंटरवर किरकोळ कारणावरून भांडण झाले. त्या भांडणाच्या रागातून आरोपी दोन कारमधून तुषार यांच्या घरी आले. चायनीज सेंटरवर झालेल्या भांडणाच्या रागातून आरोपींनी तुषार आणि त्यांच्या चुलतीला घरासमोर पडलेल्या लाकडी दांडक्याने आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. त्यात तुषार आणि त्यांची चुलती हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.