Pimpri  : बिअर वॉईन शॉप सुरु करण्यास ओम साईराम कॉम्प्लेक्सच्या रहिवाशांचा विरोध

एमपीसी न्यूज – पिंपरी येथील लिंक रोडवरील ओम साईराम कॉम्प्लेक्सला लागूनच असलेल्या बिल्डिंगमध्ये बिअर, वाईन शॉपचे बार उघडत आहे. यास ओम साईराम कॉम्प्लेक्सच्या रहिवाशांनी विरोध दर्शविला आहे. याठिकाणी वाईन शॉप होऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखीनिवेदनांद्वारे मागणीही केली आहे. 

दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, ओम साईराम कॉम्प्लेक्स येथे अर्जदाराच्या कुटुंबातील महिला व मुला-मुलीची ये-जा असते. याठिकाणी पहिली ते पंधरावीपर्यंतच्या वर्गातील मुला-मुलींची शिकविण्याची वेळ सकाळी ते रात्री नऊपर्यंत चालू असते. त्यामुळे तेथे पूर्णवेळ पहिली ते पंधरावीपर्यंत शिकणा-या वयोगटातील मुले-मुली ये जा सुरु असते. बाजूला बालवाडी असून तेथे महिला, पालक, लहान मुले यांचीही ये- जा सुरु असते. याच परिसरातील रमाबाई भाटनगर भागातील छोट्या मुलींवर बलात्कार करुन तिचा खून करण्यात आला.
त्यामुळे या सर्व परिसरात महिलांमध्ये लहान-मुलींमध्ये भीतीचे वातावरण असून याचठिकाणी बिअर वाईन शॉप सुरु झाल्यास धोका निर्माण होईल. याठिकाणी सुरु होणारे बिअर वॉईन शॉप सुरु होऊ देणार नाही, अन्यथा रहिवाशांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.